पुणे : पुण्यातील हडपसर भागातील मांजरी येथील मुळा मुठा नदी पात्रात असलेल्या झाडीमध्ये नेऊन १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणांतील दोन्ही आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली. अनुराग साळवे वय २१ वर्ष, रा.आनंदनगर केशवनगर मुंढवा, गणेश अनिल म्हेत्रे वय २३ वर्ष रा. शिंदे वस्ती मुंढवा अशी आरोपींची नाव आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुणे : देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं ‘हे’ आवाहन, म्हणाले…

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी… यंदा करदिलासा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी, तिची मैत्रीण या दोघींना सोमवारी सायंकाळच्या सुमारास आरोपी अनुराग साळवे, गणेश अनिल म्हेत्रे हे दोघे मित्र म्हणाले की, आपण कुठे तरी फिरायला जाऊ, त्यानंतर चौघेजण मांजरी येथील नदीपात्रालगत असलेल्या झाडीत गेल्यावर, आरोपी अनुराग साळवी आणि गणेश म्हेत्रे या दोघांनी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकाराबाबत पीडित मुलीने घरच्या मंडळींना सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर पीडित मुलीने आमच्याकडे तक्रार देताच, दोन्ही आरोपींना अटक केली असून आरोपी अनुराग साळवी आणि गणेश म्हेत्रे यांच्याकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.