पायी चालण्याची कसोटी पाहणारा अवघड वळणाचा दिवे घाट पार केल्यानंतरच विठ्ठलाचे दर्शन होणार आहे. दिवे घाट संपत आल्यावर पालखी सासवडच्या दिशेने मार्गस्थ होत असताना डावीकडे तब्बल ४५ फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती साकारण्यात आली आहे. यंदा पायी पालखी सोहळा नसला तरी ही भव्य मूर्ती या मार्गाने जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पुणे ते सासवड हा पल्ला सर्वात मोठय़ा अंतराचा आहे. हडपसर येथील रहिवासी विजय कोल्हापुरे यांनी दिवे घाट संपताना डावीकडे असलेल्या हॉटेल परिसरातील जागेवर विठ्ठलाची भव्य मूर्ती उभी केली आहे. सागर भावसार यांनी ही मूर्ती घडविली आहे.
आणखी वाचा