पुणे: पिंपरी- चिंचवड शहरात एच ३ एन २ ने बाधित असलेल्या ७३ वर्षीय वृद्धाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. ८ मार्च पासून त्या वृद्धावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. असे आवाहन महानगर पालिकेचे डॉक्टर विनय पाटील यांनी केले आहे.
आज एच ३ एन २ विषयी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरोग्य विभागा सोबत बैठक घेऊन आढावा घेणार आहेत. मास्क बाबत देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पिंपरी- चिंचवड शहरात एच ३ एन २ ने बाधित आणि सहव्याधी असलेल्या ७३ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आणखी वाचा- सावधान..! उपराजधानीत आणखी एका ‘एच ३ एन २’ग्रस्ताचा मृत्यू
गेल्या ८ मार्च पासून त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गर्दी च्या ठिकाणी नागरिकांनी मास्क वापरावा. ताप, सर्दी, खोकला असेल तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन एच ३ एन २ तपासणी करून घ्यावी. वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी असे आवाहन महानगर पालिकेचे डॉक्टर विनायक पाटील यांनी केले आहे.