पिंपरी : गावी जाण्यावरून झालेल्या घरगुती भांडणातून ७९ वर्षीय पतीने ७५ वर्षांच्या महिलेवर राहत्या घरात कोयत्याने वार करून तिचा खून केला. त्यानंतर स्वत:वरही वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी हिंजवडीत उघडकीस आली.

आशा महेंद्र जैन (वय ७५, रा. विंड मिल व्हिलेज, हिंजवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती महेंद्र दयालचंद्र जैन (वय ७९) हे जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जैन यांचे जावई संदीप सुभाषचंद जैन (वय ५७) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
कर्जाला कंटाळून मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या 
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
actor amit tandon cheated wife ruby tandon
पत्नीची अनेकदा फसवणूक केली, अभिनेत्याचा स्वतःच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल खुलासा; घटस्फोट घेतल्यावर सहा वर्षांनी पुन्हा तिच्याशीच केलं लग्न

हेही वाचा >>>शिरूरमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्याची आढळरावांची अप्रत्यक्ष कबुली

आरोपी महेंद्र आणि आशा यांच्यात मंगळवारी रात्री गावी जाण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर दोघे झोपायला गेले. सकाळी सहा वाजता फिर्यादी संदीप हे फिरून आले. त्यानंतर ते दूरचित्रवाणी पाहत बसले होते. सकाळी सात वाजता त्यांची पत्नी आई-वडिलांना उठवायला गेली असता आई-वडील दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. आरोपी महेंद्र यांनी घराच्या बागेतील कामासाठी आणलेल्या कोयत्याने पत्नीवर वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर स्वत:वरही वार करून घेतले. यात त्यांच्या गळ्यावर आणि दोन्ही हातांवर किरकोळ जखमा झाल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ तपास करीत आहेत.