पुण्यातील वारजे माळवाडी भागातील ७९ वर्षीय एका सेवा निवृत्त बॅंक कर्मचार्याला तुम्हाला डेटिंगकरिता मुलगी हवी आहे का ? असा फ़ोन करून तब्बल १७ लाख १० हजार रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी श्रेया नावाच्या अनोळख्या तरुणी विरोधात वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक; पुणे रेल्वे स्थानक, बुधवार पेठेत गुन्हे शाखेची कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी भागात एक ७९ वर्षीय सेवा निवृत्त बँक कर्मचारी राहण्यास आहेत. त्यांना डिसेंबर २०२१ मध्ये श्रेया नावाच्या अनोळखी तरुणीचा फोन आला.तुम्हाला डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का ? त्यावेळी दोघांमध्ये बोलणे झाल्यानुसार आरोपी श्रेया हिने तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल, असे ७९ वर्षीय व्यक्तीला सांगितले. त्यानुसार त्यांनी काही रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली. त्यानंतर दोघांमध्ये सतत फोन होत राहिले.डिसेंबर २०२१ ते जून २०२२ पर्यंत वेळोवेळी तब्बल १७ लाख १० हजार रुपये दिले. तरी देखील डेटिंग करिता मुलगी पाठवली नाही.
त्याबाबत आरोपी श्रेयाकडे जाब विचारला असता. तिने कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे ७९ वर्षीय व्यक्तीच्या लक्षात आल्यावर, आमच्याकडे त्यांनी तक्रार दाखल करण्यात आली आहे. श्रेया नावाच्या अनोळखी तरुणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वारजे माळवाडी पोलिसांनी दिली आहे.