पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे निलख येथील करिपाल निवासमध्ये मोठी घरफोडी झाली आहे. यात तब्बल ९० तोळे सोने चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. ही घटना आज दुपारी घडली असून संध्याकाळी साडेआठ वाजता समोर आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करिपाल जोजप थॉमस (वय ६२, रा. पिंपळे निलख) हे पत्नी आणि विवाहित मुलीसह विशालनगर येथे राहतात. करिपाल जोजप थॉमस आणि त्यांची पत्नी हे दोघे एका खाजगी कंपनीत काम करतात. तर विवाहित मुलगी प्रिझा थॉमस ही संगणक अभियंता आहे. हे सर्वजण कामावर गेले असताना चोरट्यांनी पाळत ठेवून ही घरफोडी केली. यात तब्बल ९० तोळे सोने आणि ३५ हजारांची रोख रक्कम त्यांनी लंपास केली. प्रिझा थॉमस हीचा नोहेंबर महिन्यात विवाह झाला असून तिला १५ लाखांचे दागिने केले होते. तर जानेवारी महिन्यात नातेवाईकाच्या मुलीचे लग्न असल्याने १० लाखांचे सोन्याचे दागिने हे यांच्या घरी ठेवण्यात आले होते.

या प्रकरणाचा अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Story img Loader