पुणे : वाराणसी येथील ’ज्ञानवापी’बाबतच्या इतिहासावर आधारित पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यासाठी अनेक कागदपत्रांचा अभ्यास केला आहे. इतिहास अभ्यास मी दहावी-बारावीच्या परीक्षेवेळीही केला नव्हता. फेब्रुवारीमध्ये हे पुस्तक प्रकाशित होणार असल्याची माहिती संपत यांनी दिली. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समज-गैरसमज’ या विषयावर संपत बोलत होते. अमित परांजपे यांनी संपत यांच्याशी संवाद साधला. महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>मालमत्ता कराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय : मालमत्ता कर नावावर करण्यासाठी महापालिकेत जाण्याची गरज नाही!

सावरकरांवर पुस्तक लिहिण्याबाबत संपत म्हणाले, की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत महाराष्ट्राबाहेरील लोकांना माहिती नाही. सावरकरांवर सखोल पुस्तक नाही. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) पुस्तकांत माहिती नाही. आपल्या इतिहासात ठराविक लोकांनाच स्थान दिले असून, इतरांना डावलल्याचे दिसून येते. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला, असे संपत यांनी सांगितले. सावरकरांच्या जीवनातील काही घटना, प्रसंगांबाबत त्यांनी माहिती दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वापर राजकीय पक्षांनी केवळ स्वत:च्या फायद्यासाठी केला. पक्षांनी निवडणुकीत, जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अनेक आश्वासने दिली. मात्र, आश्वासनांच्या पूर्ततेबाबत तत्परतेने काम केले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचा इतिहास माहिती नसतानाही काही लोक त्यांच्यावर टीका करतात. सावरकर यांच्यावर प्रेम करा किंवा त्यांचा विरोध करा. मात्र, त्यापूर्वी त्यांच्याबाबतचे तथ्य जाणून घेतले पाहिजे. नोटेवर कधीपर्यंत एकाच व्यक्तीचे छायाचित्र किती काळ राहणार माहीत नाही. पण स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा थोर महापुरुषांचे छायाचित्र नोटेवर कधी येणार याची प्रतीक्षा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A book based on the history of gyanvapi is coming soon pune print news ccp 14 amy