हडपसर भागातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात लावलेल्या बसने अचानक पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात घबराट उडाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हडपसर भागातील एंजल मिकी मिनी स्कुलच्या आवारात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसला अचानक आग लागली. बसमध्ये विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काळेपडळ अग्निशमन केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल गायकवाड, जवान सरोदे, चौधरी, दडस, कोंडगेकर, बिचकुले यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

आगीमागचे कारण समजू शकले नाही. गेल्या महिन्यात कात्रज-कोंढवा रस्त्यावर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसला आग लागली होती. बसच्या अंतर्गत भागात शॅार्ट सर्किंट होऊन आग लागण्याच्या घटना घडतात, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A bus carrying students caught fire in hadapsar pune print news amy