पिंपरी: निगडी प्राधिकरणातील एका व्यावसायिकाला दोन महिलांनी मिळून अडीच लाख रूपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी दोन्ही महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजीत पुरूषोत्तम इंगळे (वय-४४, रा. रोहन पार्क, प्राधिकरण, निगडी) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी निगडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

हेही वाचा <<< पिंपरी : खेड, जुन्नर भागातील प्रश्नांना चालना देणार ,आंबेगव्हाण वनक्षेत्रात ‘बिबट सफारी प्रकल्प’ साकारणार ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हेही वाचा <<< राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचा मार्ग मोकळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत इंगळे यांना दोन महिलांनी फसवले आहे. त्यापैकी पहिलीशी इंगळे यांची ओळख मेट्रोमोनिअल साईटवर झाली होती. तिने लग्न करण्याचे आमिष दाखवून इंगळे यांच्याकडून आईच्या उपचाराच्या नावाखाली २ लाख ६५ हजार रूपये ऑनलाईन भरण्यास सांगितले. या फसवणुकीत पहिलीला दुसऱ्या महिलेने मदत केली. याप्रकरणी १५ सप्टेंबरला या दोन्हीही महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक ओमासे करत आहेत.

Story img Loader