दहीहंडी उत्सवात सजावट साहित्य उपलब्ध करुन देणाऱ्या व्यावसायिक तरुणाला धमकावून त्याच्या गळ्यातील एक लाखांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौकात घडली.याबाबत सुनील कुंभार (वय ३०, रा. हॅपी कॅालनी, कोथरुड) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुंभार यांचा सजावट साहित्याचा व्यवसाय आहे. दहीहंडीसाठी गणपती चौकातील एका मंडळाला सजावट साहित्य कुंभार यांनी उपलप्ध करुन दिले होते. दहीहंडीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मध्यरात्री कुंभार यांनी गणपती चौकात सजावट साहित्य उतरवले.

हेही वाचा – पुणे : चंदननगर परिसरात तरुणाचा गोळ्या झाडून खून

टेम्पोत सजावट कामगारांनी भरले. लक्ष्मी रस्त्यावर कुंभार यांनी मोटार लावली होती. कुंभार मध्यरात्री दीडच्या सुमारास मोटारीकडे जात होते. त्या वेळी अचानक चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यांच्या डोळ्यात फवारा मारुन चोरट्यांनी कुंभार यांच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. त्यानंतर कुंभार यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक राकेश सरडे तपास करत आहेत.

Story img Loader