पुणे : विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी अर्धवट गाडलेली शिवकालीन तोफ आढळली आहे. ही तोफ लवकरच विसापूर किल्ल्यावर नेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पुरातत्व विभाग, स्थानिक आमदार, तहसीलदार यांना देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी स्थानिक नागरीक अनंता गोरे यांना माती खोदत असताना तोफ सापडली आहे.
हेही वाचा… पुणे : संगणक अभियंत्याची साडेअकरा लाखांची फसवणूक ; गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक
हेही वाचा… मनसेची भिस्त ‘राज’दूतांवर ! ; हजार मतदारांमागे मनसेचा एक राजदूत, निवडणुकीसाठी मनसेची नवी रणनीती
अनंता गोरे हे विसापूर किल्ल्याच्या पायथ्याजवळ दुकानाच्या जवळच खोदकाम करत होते. तेव्हा त्यांना मातीत अर्धवट गाडलेली तोफ आढळली. तोफ मातीतून बाहेर काढण्यात आली असून ती सध्या विसापूर किल्ल्याच्या वाटेवर पायथ्याशी ठेवण्यात आली आहे. पुरातत्व खात्यातील अधिकाऱ्यांनी ही तोफ किल्ल्यावर घेऊन जाण्यास हरकत नसल्याच म्हटलं आहे. दरम्यान, किल्ल्यावर तोफ घेऊन जाण्यासाठी स्थानिक तरुणांनी सहभागी होण्याची आवाहन करण्यात आलं आहे. याबाबत ची माहिती पुरातत्व विभागाचे गजानन मंडवरेकर, आमदार सुनील शेळके,तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना याबाबत ची माहिती देण्यात आली आहे.