रस्ते बांधणी करणाऱ्या कंपनीतील प्रकल्प अधिकाऱ्याने नऊ कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाम अशोक निकम (रा. शिंगणापूर, अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वृजेंद्रकुमार इंद्रदेव सिंह (वय ४२, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
हेही वाचा- पुणे : सदनिकेत प्लंबिंग काम करताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू ; वारजे भागातील घटना
वृजेंद्रकुमार सिंह यांची ‘रोडवे सोल्यूशन इंडिया इन्फ्रा’ कंपनी आहे. या कंपनीकडून खेड-सिन्नर, म्हसवड-पिलिव्ह, कुर्डुवाडी-पंढरपूर, सातारा-रहिमतपूर या मार्गाचे काम करण्यात आले. २०१६ ते २०२१ या कालवधीत निकम कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम करत होता. निकम याने डिझेल, खडी, डांबर तसेच अन्य साहित्याचा अपहार करुन कंपनीची नऊ कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे सिंह यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.