पिंपरी : नोकरीसाठी पश्चिम बंगालवरुन आलेल्या तरुणीच्या विनयभंगप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी सभापतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपरी आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

याबाबत पश्चिम बंगालमधून आलेल्या एका २८ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश्‍वर रेड्डी, चिरागउद्दीन शेख, महिला आरोपी (तिघेही रा. कोंढवा, पुणे) आणि अर्जुन ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अर्जुन ठाकरे पिंपरी महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती आहेत.फिर्यादीला एका संकेतस्थळावर एका महिलेचा नंबर मिळाला. त्या महिलेने तरुणीला बॅंकेत नोकरीसाठी मुलाखत असल्याचे सांगत पुण्यात बोलविले. नंतर बॅंकेत नोकरीसाठी वेळ लागणार असल्याचे सांगून इतर नोकरीसाठी अर्जुन ठाकरे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले.

Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
case filed against man who help to escape accused in kalyan district court
कल्याण जिल्हा न्यायालयात आरोपीला पळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इसमावर गुन्हा
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
गँगस्टर डीके रावसह सात जणांविरोधात खंडणीचा गुन्हा, गुन्हे शाखेची कारवाई
पुणे: मद्यालयात झालेल्या वादातून ग्राहकांना बेदम मारहाण; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मद्यालयातील कामगारांविरुद्ध गुन्हा
accused akshay shinde encounter
अन्वयार्थ : हत्येचा गुन्हा दाखल कराच

हेही वाचा >>>पावसाच्या अंदाजावर पाणी; राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला; २३ जूनपासून सक्रिय होण्याचा नवा अंदाज

त्यानंतर ठाकरे यांनी तिला चिरागउद्दीन शेख, महिला आरोपी आणि महेश्‍वर रेड्डी यांच्याशी ओळख करून दिली. १५ मे रोजी आरोपींच्या पुण्यातील कार्यालयात बोलविले. तिथे ठाकरे यांनी विनयभंग केल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर मुख्य आरोपी रेड्डी याने वारंवार पुणे आणि पिंपरी येथील कार्यालयात विनयभंग केला. तर ३ जून रोजी पुण्यातील कार्यालयात शौचालायामध्ये जाऊन रेड्डी याने तिच्यावर अतिप्रसंग केला. या प्रकारानंतर पीडित मुलगी जाऊ लागली असता महिला आरोपीने तिला अडविले. आम्ही देखील वेगवेगळ्या मुली रेड्डी याला दिल्या आहेत. तू देखील त्यांना खूश कर, असे सांगितले. त्यानंतर चिरागउद्दीन तिथे आला व त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले. ४ जून रोजी रेड्डी याने तरुणीला व्हिडिओ कॉल करून अश्‍लील चाळे दाखविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Story img Loader