पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या पुण्यात आंतरजातीय विवाह केल्याने एका कुटुंबाला समाजातून २३ वर्षांपूर्वी जातीपंचायतीने बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. समाजात परत घेण्यासाठी सव्वा लाख रुपये दंड मागितल्याप्रकरणी श्री गौड ब्राह्मण समाजाच्या जात पंचायतीतील पंचांसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- नव्या संगणकप्रणालीचा म्हाडा सोडतीला फटका? घरांसाठी ६० हजारांपैकी केवळ १८७१ अर्ज मंजूर

Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Chhagan Bhujbal alleges Sharad Pawar who broke the Shiv Sena in 1991
१९९१ मध्ये शरद पवार यांनीच शिवसेना फोडली; छगन भुजबळ यांचा आरोप
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार

याबाबत प्रकाश नेमीचंद डांगी (वय ४६, रा. हरपळे गल्ली, फुरसुंगी, हडपसर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ताराचंद काळूराम ओझा (रा. गंज पेठ), भरत नेमीचंद मेवाणी (रा. अरण्येश्वर), मोतीला भोमाराम शर्मा डांगी (रा. खिवाडा, जि. पाली, राजस्थान), प्रकाश लालूराम बोलद्रा उर्फ शर्मा (रा. पद्मावती), संतोष उणेचा (रा. भवानी पेठ), बाळू शंकरलाल डांगी (रा. पाषाण), भवरलाल डांगी (रा. मारवाड जंक्शन, राजस्थान), हेमाराम ओझा (रा. सिनला, जोधपूर, राजस्थान) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- अंदमानातील बेटाला पुणेकर वीर योद्ध्याचे नाव; परमवीर चक्र विजेते दिवंगत राम राघोबा राणे यांचा सन्मान

फिर्यादी प्रकाश डांगी श्री गौड ब्राह्मण समाजातील असून ते रिक्षाचालक आहेत. १९९८ मध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले होते. समाजाकडून बांधण्यात येणाऱ्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या बैठकीसाठी ते गेले होते. बिबवेवाडीतील एका मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंचांनी डांगी यांना मंदिरातील बैठकीत कसा आला, तुला समाजातून बहिष्कृत करण्यात आले आहे. तू निघून जा, असे सांगितले.

हेही वाचा- पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी नोंदणीत यंदा वाढ; ८ लाख ९९ हजार ९२१ विद्यार्थ्यांची नोंदणी

निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव नव्हते. समाजाच्या विविध कार्यक्रमांचे निमंत्रण डांगी यांना देण्यात आले नव्हते. पद्मावतीतील एका सभागृहात नुकतेच स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे निमंत्रण डांगी यांना देण्यात आले नव्हते. समाजातील प्रत्येक कार्यक्रमांपासून डांगी यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते. डांगी यांनी समाजात परत घ्या, असे पंचांना सांगितले. समाजाचे अध्यक्ष मोतीला शर्मा, भरत मावाणी यांच्याकडे अर्ज केला होता. समाजात पुन्हा यायचे असेल तर एक लाख २५ हजार रुपये दंड मागण्यात आला. अखेर डांगी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार २०१६ च्या सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा कलम ६ आणि ७ नुसार तसेच भारतीय दंडसंहिता कलम ३४ नुसार पंचांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.