वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाखाली लाच मागितल्याचा आरोपावरून ग्रामीण पोलिसांच्या शिक्रापूर पोलीस ठाण्यातील हवालदाराच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) गुन्हा दाखल करण्यात आला. अमीरुद्दीन रफीउद्दीन चमनशेख ( वय ४३) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

हेही वाचा- पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ; गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना

kawad village bhiwandi wada road theft attempt failed
बंगल्यात चोरी करण्यासाठी चोरट्यांची टोळी जीपगाडीने आली पण मार खाऊन गेले
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Marathi mandatory in government offices news in marathi
सरकारी कार्यालयात ‘मराठीतच बोला!’ कर्मचारी मराठीत न बोलल्यास शिस्तभंगाची कारवाई
Fraud, cheap house, government quota,
सरकारी कोट्यातून स्वस्त दरात घरे देण्याच्या नावाखाली सुमारे २५ कोटींची फसवणूक, पुरुषोत्तम चव्हाणसह इतर आरोपीविरोधात गुन्हा
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप
case filed against two for digging roads laying illegal sewers and connecting pipes without Bhiwandi Municipal Corporations permission
बेकायदा नळजोडणी पडली महागात, भिवंडी पालिकेने केले गुन्हे दाखल
bombay high court orders to stand with dont drink and drive banner at traffic junction
सिग्नलवर ‘दारू पिऊन वाहन चालवू नका’चा फलक घेऊन उभा राहा ; उच्च न्यायालयाची आगळी शिक्षा
Torres Scam Case, High Court, police, Torres Scam,
टोरेस घोटाळा प्रकरण : कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर, पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे

अमीरुद्दीन विरुद्ध जुलै महिन्यात तक्रार करण्यात आली होती. त्याबाबत पडताळणी करून हा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. चमनशेख शिक्रापूर पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहे. त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोबाइल संच द्यायचे असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे लाच मागितली होती. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली. तांत्रिक विश्लेषण आणि तक्रारदार व्यावसायिकाचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस हवालदार चमनशेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader