पुणे : पंतप्रधान नरेंद्र माेदी, तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारा मजकूर समाजमाध्यमात प्रसारित केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.सागर सावंत (वय २१, रा. निओ सिटीमागे, वाघोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत रवींद्र पडवळ (वय ३०, रा. वडकी) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुुसार, पडवळ यांचा मित्र सुजित खेडक याच्या समाजमाध्यमातील खात्यावर सावंत याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला. त्याने धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक भालेराव तपास करत आहेत.