लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: ढाबळीतील कबुतर घेतल्याच्या वादातून सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने एका १२ वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन त्याला कबुतराची विष्टा खायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कात्रजमधील संतोषीमाता मंदिराच्या मागील बाजूला हा प्रकार घडला.

pune police burglar arrested marathi news
‘डिलिव्हरी बॉय’च्या वेशात घरफोडी, करणाऱ्या चोरट्यासह साथीदार गजाआड, ८० लाखांच्या ऐवजासह पिस्तूल, काडतुसे जप्त
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
buldhana students hospitalized loksatta
बुलढाणा : शेगाव गतिमंद विद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; एकाचा मृत्यू
Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
deadbodies founf in meerut
कुलूप असलेल्या घरात आढळले पाच मृतदेह, जोडप्याचा मृतदेह जमिनीवर, तर चिमुकल्यांचा बेडमध्ये; कुठे घडली भीषण घटना?
poor children collected food
‘जेव्हा पोटातली भूक मर्यादा ओलांडते…’ त्यांनी खरकटं अन्न गोळा करून असं काही केलं… VIDEO पाहून व्हाल भावूक
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक

या बाबत कात्रजमधील संतोषनगर येथील एका अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सराईत गुन्हेगार अमोल आडम याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रजमधील संतोषीमाता मंदिराच्या मागील बाजूस मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. त्यातील दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा… पुण्यातील स्वयंचलित ‘ई-टाॅयलेट्स’ का पडली बंद?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कबुतरे पाळली होती. त्यातील एक कबुतर फिर्यादीच्या १२ वर्षाच्या मुलाने आणले होते. त्यावरुन अमोल आडम हा त्याच्या तीन साथीदारांसह संतोषनगरमध्ये आला. त्यांनी हवेत हत्यारे फिरवून कोणी जर मध्ये आले, तर एका एकाला तोडून टाकीन, असे म्हणून दहशत निर्माण केली. फिर्यादी यांच्या बारा वर्षाच्या मुलाला हाताने मारहाण आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याला दुचाकीवर बसवून कात्रज येथील साई अपार्टमेंट येथे नेले. तेथे त्याला कबुतराची विष्टा खायला लावली. त्यानंतर ‘पोलिसांना आमचे घर दाखविले तर तुला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी देऊन त्याला साई मंदिराजवळ सोडून दिले. त्यानंतर त्याने हा प्रकार वडिलांना सांगितला. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे तपास करीत आहेत.

Story img Loader