पुणे: तारांकित हाॅटेलमधील शेफने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी शेफविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
मुकेशसिंह पुन्हील (वय ३१) असे गुन्हा दाखल केलेल्या शेफचे नाव आहे. याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला येरवडा भागातील एका तारांकित हाॅटेलमध्ये कर्मचारी आहे. ती तारांकित हाॅटेलमधील भटारखान्यात काम करते.
हेही वाचा… पोलिसांवर गोळीबार करुन पसार झालेला दरोडेखोर जेरबंद; पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यात गुन्हे
महिला कामावर वेळेत येत नसल्याचा आरोप करुन पुन्हील याने हजेरी पुस्तिकेची तपासणी केली. त्याने महिलेशी अश्लील वर्तन करुन विनयभंग केला. महिलेने अंडी चोरल्याचा आरोप करून अश्लील शेरेबाजी केली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
First published on: 18-12-2023 at 12:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against the chef who accused a woman of stealing an egg and made obscene comments pune print news rbk 25 dvr