पुणे : नगर रस्त्यावर वडगाव शेरी परिसरात रासायनिक पदार्थाची वाहतूक करणारा टँकर उलटल्याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. निष्काळजीपणे टँकर चालवून मानवी जिवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजाराम दुबरी वर्मा (वय ५१, रा. जयनगर, ता. फैजाबाद, जि. अयोध्या) असे गुन्हा दाखल केलेल्या टँकर चालकाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई साईनाथ म्हस्के यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठाणे परिसरात रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनी आहे. तेथून इथिलिन ऑक्साइड वायू घेऊन टँकर धाराशिव येथील बालाजी कंपनी येथे निघाला होता. नगर रस्त्यावर वडगाव शेरी येथे रविवारी मध्यरात्री टँकर उलटलून वायूगळती झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी धोका विचारात घेऊन टँकरवर सलग पाण्याचा मारा सुरू ठेवला. इथिलिन ऑक्साइड वायू ज्वलनशील आहे. टँकर उलटल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती कौशल्य पणाला लावून हाताळली. टँकर उलटल्यानंतर तीन किलोमीटरच्या परिसरातील रहिवासी, उपाहारगृहचालक, दुकानदारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

हेही वाचा – पिंपरी- चिंचवडमधील ‘हे’ नेत्र रुग्णालय रुग्णांसाठी ठरतंय आशादायी! परराज्यांतून येत आहेत रुग्ण

हेही वाचा – पुणे : ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यानंतर आता कारागृह रक्षकही गजाआड

अपघातानंतर नगर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. वाहनांच्या रांगा नगर रस्त्यावर लागल्या होत्या. १६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर वायूगळती रोखण्यात यश आले. वायूगळती रोखताना पुरेशी काळजी घेतली नसती तर स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती. सोमवारी दुपारी अपघातग्रस्त टँकरमधील वायू दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला. रिलायन्स पेट्रोकेमिकल्सच्या तंत्रज्ञांनी घटनास्थळी भेट दिली होती. टँकरमध्ये ज्वलनशील वायू होता. नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against the tanker driver in the case of gas leakage on the city road pune print news rbk 25 ssb