लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: देहूरोड येथे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये तीन श्वानांना बांधून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास संकल्पनगरी येथे घडली.

याप्रकरणी पीयूष हरिशकुमार चतुर्वेदी (वय २९, रा. भूमकर चौक, ताथवडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… सावधान! रेल्वेने विनातिकीट प्रवास करताय…

देहूरोडमधील संकल्पनगरी येथे तीन श्वानांना प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधले असल्याची माहिती चतुर्वेदी यांना मिळाली. श्वानांचे तोंड आणि पाय दोरीने बांधण्यात आले होते. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी सांगितले.

Story img Loader