लोकसत्ता वार्ताहर

लोणावळा: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यावर सट्टा घेणाऱ्या पाच जणांवर लोणावळ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एक लॅपटाॅप, काही मोबाईल संच आणि दूरचित्रवाणी असा एक लाख ५७ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने लोणावळ्यातील एका बंगल्यात ही कारवाई केली.

Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
cyber fraudsters, Eight people arrested ,
सायबर फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?
loksatta kutuhal artificial intelligence in decision making
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्णयांची अंमलबजावणी
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!

याप्रकरणी पुणे ग्रामीण एलसीबीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून राजविनसिंग मनजितसिंग बांगा (वय २७, रा. वडाळा ट्रक टर्मिनल, मुंबई), मस्कीनसिंग रजेद्रसिंग अरोरा (वय ३०, रा पंजाबी काॅलनी, सायन कोळीवाडा), शशांक महाराणा (रा. प्रतिक्षानगर, सायन ईस्ट), ईफ्तेकार ऊर्फ इमरान खान (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही), षेन्टी (पुर्ण नाव माहित नाही) रा. सायन ईस्ट कोळीवाडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… पुण्यात गारांसह पावसाची हजेरी

राजस्थान राॅयल विरुद्ध लखनऊ जाएंट यांच्यामध्ये जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या आयपीएल सामन्यावर काही जण एका खाजगी बंगल्यात बसून सट्टा घेत असल्याची गुप्त माहिती पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. या पथकाने तुंगार्ली भागातील बंगल्याजवळ सापळा लावत बुधवारी रात्री छापा मारला असता बंगल्यामध्ये वरील सर्वजण वेगवेगळ्या नावाने घेतलेल्या विविध मोबाइल सिम च्या माध्यमातून काही ॲप्लिकेशनचा वापर करत लॅपटाॅपवर सट्टा घेत असताना सापडले. शासनाची बंदी असताना देखील फसवणूक करत सट्टा सुरू असल्याचे दिसून आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अप्पर अधीक्षक व एलसीबी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी हे पुढील तपास करत आहेत.