शहरातील शाळा सीबीएसई अभ्यासक्रमाशी संलग्न करण्याबाबतचे बनावट ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) तयार केल्या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शिक्षण अधिकारी सुनंदा वाघमारे (वय ४३) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बनावट ना -हरकत प्रमाणपत्र तयार केल्या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>पुणे : अंगारकी चतुर्थी निमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, पहाटेपासूनच रांग
पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात क्रिएटिव्ही एज्युकेशन सोसायटी संचलित पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर काॅलेज, पुणे एम. पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर स्कुल, एज्युकेशनल करिअर फाऊंडेशन संचलित नमो आर. आय. एम. एस. या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सीबीएसई अभ्यासक्रमाशी संलग्न करण्याबाबत जुलै २०२२ पूर्वी बनावट ना-हरकत प्रमाणपत्र सादर करुन फसवणूक केल्याचे शिक्षणाधिकारी सुनंदा वाघमारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.सीबीएसई अभ्यासक्रमाशी संलग्न करण्याबाबत बनावट प्रमाणपत्र तसेच मान्यता नसताना सीबीएसई अभ्यासक्रमावर शाळा सुरू असल्याचे उघडकीस आल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाकडून तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके तपास करत आहेत.