पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डाॅ. महेश रघुनाथ दवंगे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – केवळ ३४ हजार निरक्षरांची नोंदणी; नवसाक्षरता अभियानावर शिक्षक संघटनांचा बहिष्कार

हेही वाचा – ‘एनआयए’कडून पुण्यात आणखी एका दहशतवाद्याला अटक

विद्यापीठाच्या आवारातील मुलांचे वसतिगृह (वसतिगृह क्रमांक ८) येथे कपडे धुण्याच्या जागेजवळ भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी (२ नोव्हेंबर) उघडकीस आला. या घटनेचे पडसाद विद्यापीठाच्या आवारात उमटले. पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह भाषेत मजकूर लिहिल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली. त्यानंतर याप्रकरणी विद्यापीठाकडून पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली असून, पोलिसांनी विद्यापीठाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. सहायक पाेलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.