पतीपासून वेगळ्या राहणार्‍या २४ वर्षीय पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणार्‍या पुणे शहर पोलीस विभागातील गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच नाही तर या प्रकरणात मुख्य आरोपीस साथ देणाऱ्या देणार्‍या पोलीस कर्मचार्‍यासह एकुण चार जणां विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी पोलीस कर्मचारी कादीर कलंदर शेख, साथीदार पोलीस कर्मचारी समीर पटेल यांच्या सह चार जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २४ वर्षीय महिला ही मुंढवा परिसरामध्ये राहत आहे. तिला चार वर्षाचा मुलगा असून ती पतीपासून वेगळे राहत आहे. घर खर्च भागविण्यासाठी तिचे हॉटेल आहे. मुख्य आरोपी कादीर कलंदर शेख हा तिच्या हॉटेलमध्ये तीन वर्षापासुन नेहमी जात होता. त्यातून त्या दोघांची मैत्री आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले.

हेही वाचा… खडतर परिस्थितीवर मात करून तो बनला पोलिस उपनिरीक्षक; लग्न समारंभात केलेले वेटरचे काम!

या तीन वर्षाच्या कालावधीत पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत राहिला.या कालावधीत लग्नाचा विषय काढल्यावर मुख्य आरोपी कादीर कलंदर शेख हा प्रत्येक वेळी टाळाटाळ करीत होता. यामधून दोघांमध्ये अनेक वेळा वाद होत होते. त्यामुळे आरोपी हा पीडित महिलेला काही दिवसापासून भेट देखील टाळत होता आणि तिच्या फोनला देखील तो प्रतिसाद देत नव्हता.

हेही वाचा… खरीप हंगामातील पेरणी १४ टक्केच! तेलबिया, कापूस लागवडीला वेग; भात, कडधान्यांचा पेरा संथ गतीने

त्याच दरम्यान एक जुलै रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कॅम्प परिसरात मुख्य आरोपी कादीर कलंदर शेख हा एका हॉटेलमध्ये पोलिस कर्मचारी समीर पटेल यांच्या सोबत होता. त्यावेळी त्यांच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते. त्यावेळी पीडित महिलेने आपण लग्न केव्हा करणार असा जाब विचारत आरोपीला हॉटेल बाहेर आणले. त्यावरून त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.आरोपी कादीर कलंदर शेख याने पीडित महिलेस मारहाण केली.त्या दरम्यान मुख्य आरोपीचा मित्र पोलिस कर्मचारी समीर पटेल यासह एक पुरुष आणि महिलेने पकडून मारहाण करित शिवीगाळ देखील केली.

हेही वाचा… झारखंडमधील मोबाइल चोरट्याला पुण्यात अटक; २९ मोबाइल जप्त… ‘अशी’ करायचा मोबाइल चोरी

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार मुख्य आरोपी पोलीस कर्मचारी कादीर कलंदर शेख विरोधात बलात्कार, मारहाण,जातीवाचक शिवीगाळ,तसेच साथीदार पोलीस कर्मचारी समीर पटेल यांच्यासह दोघे जण असे एकूण चौघाविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.