पुणे : कोरेगाव पार्क भागातील एका पबमध्ये एका गायिकेने राष्ट्रध्वज प्रेक्षकांमध्ये भिरकावल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गायिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी गायिका उमा शांती, कार्तिक मोरे (रा. औंध) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोरेगाव पार्क भागातील हॉटेल फ्रेक सुपर क्लबमध्ये रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पोलीस हवालदार तानाजी देशमुख (वय ४५) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>>प्रवाशांसाठी खुशखबर ! पुणे मेट्रो धावणार सकाळी ६ पासून
हेही वाचा >>>“एआय साक्षर होण्यासाठी सज्ज व्हा; जग पादाक्रांत करा” -राज्यपाल बैस यांचे आवाहन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल फ्रेक सुपर क्लबमध्ये कार्तिक मोरे याने स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. शांती पिपल म्युझिक बँडमधील गायिका उमा शांती हिने गाताना दोन्ही हातात राष्ट्रध्वज घेतला होता. राष्ट्रध्वज हातात धरुन ती नाचत होती. तिने प्रेक्षकांमध्ये राष्ट्रध्वज भिरकावला. याबाबतची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक संदीप जोरे तपास करत आहेत.