पुणे : नियोजित गृहप्रकल्पातील प्रवेशद्वाराची कमान कोसळून सात वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी ठेकेदारासह दोन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्णव मिथीलेश राय (वय ७, सध्या रा. गुलमोहोर सोसायटी, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. अर्णवचे वडील मिथीलेश राय (वय ३६) यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ठेकेदार सिराज मुल्ला, कामगार दाजीज इबन खान, रामप्रवेश राधेशाम राय (रा. पोरवाल रस्ता, लोहगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Biker dies in car collision in Deccan Gymkhana area Pune news
डेक्कन जिमखाना भागात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
senior citizen dies in st bus accident
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

हेही वाचा >>>देहू, आळंदीत वैष्णवांचा मेळा! तुकोबांच्या पालखीचे आज, माउलींच्या पालखीचे उद्या प्रस्थान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील नियोजित गुलमोहोर सोसायटीच्या आवारातील प्रवेशद्वार बांधकामाचे काम ठेकेदार सिराज मुल्ला याने घेतले आहे. प्रवेशद्वाराचे काम निकृष्ट केल्याने कमान कोसळली. कमानीचा काही भाग तेथे थांबलेला अर्णव राय याच्या अंगावर कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास करत आहेत.

Story img Loader