पुणे : पुणे रेल्वे स्थानकातील यार्डात रेल्वे डब्याला आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. आगीत डबा जळाला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

हेही वाचा…पुणे : पोलिसांकडून युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड, भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा डाव फसला

पुणे रेल्वे स्थानकातील यार्डात रेल्वेगाड्या थांबविण्यात येतात. यार्डात रेल्वे गाड्यांची स्वच्छता केली जाते. मध्यरात्री दोनच्या सुमारास जंक्शन यार्डात थांबलेल्या रेल्वेच्या एका डब्यात आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. चार बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. रेल्वे यार्डात थांबली असल्याने प्रवासी नव्हते. आगीत एक डबा पूर्णपण जळाला असून, दोन डब्यांना आगीची झळ पोहोचली आहे. आगीमागचे कारण समजू शकले नाही.

Story img Loader