पुणे: महाविद्यालयीन तरुणाला कोयत्याच्या धाक दाखवून त्याच्याकडील ७० हजारांची सोनसाखळी लुटण्यात आल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात घडली. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत तरुण जखमी झाला असून, याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

साईराज अनिल भांड (रा. आनंद शांती सोसायटी, अशोक चौक, नाना पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. साईराज याने याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साईराज आणि त्याचा मित्र अथर्व दिड्डी सिंबायोसिस महाविद्यालयाजवळील हनुमान टेकडी परिसरातील पॅगोडाजवळ शनिवारी दुपारी थांबले होते. दुपारी सव्वातीनच्या सुमारास दोन चोरटे तेथे आले. त्यांनी साईराज आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला शिवीगाळ सुरु केली. साईराजच्या डोक्यात कोयत्याचा दांडा मारला. त्याच्या गळ्यातील ७० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार झाले. त्यानंतर जखमी अवस्थेतील साईराजने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत.

husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा
Shocking video 4 Women Looted Jewellery over 16.5 Lakh gold heist caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; ज्वेलर्सच्या दुकानात जबरी चोरी; मिनिटांमध्ये लुटलं १६ लाखांचं सोनं
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

हेही वाचा >>>Supriya Sule slams Ajit Pawar group: “त्यांच्या दोन्ही हाताला रक्त…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर प्रहार; म्हणाल्या, “मी स्वतः त्यांच्याविरोधात…”

टेकड्यांच्या परिसरात गस्त घालण्याची सूचना

बोपदेव घाटातील सामुहिक बलात्कार प्रकरणात आरोपींनी महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील ऐवज लुटल्याचे तपासात उघडकीस आले. विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची नुकतीच भेट घेतली. बोपदेव घाट, तसेच शहरातील निर्जन ठिकाणी पोलिसांनी नियमित गस्त घालावी, अशी सूचना त्यांनी केली. हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, पाषाण-सूस रस्त्यावरील टेकडी, बाणेर टेकडी परिसरात लुटणारीच्या घटना घडल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी बाणेर टेकडीवर एका महाविद्यालयीन तरुणाला मारहाण करुन चोरट्यांनी लुटले होते.

हेही वाचा >>>बाणेर भागात नामांकित रुग्णालयात सफाई कर्मचारी महिलेवर बलात्कार,पर्यवेक्षक गजाआड

कात्रज बोगदा परिसरात लूट

कात्रज घाटातील बोगदा परिसरात सकाळी फिरायला आलेल्या दोन तरुणांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत शुभम देवराम तारु (वय २८, रा. काशिद पाटीलनगर, भिलारेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम तारु आणि त्यांचा मित्र विकास भुजबळ शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास कात्रज घाटातून निघाले होते. कात्रज बोगद्याजवळ दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडविले. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून ६० हजार रुपयांचे दोन मोबाइल संच चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.