पुणे: अपघात प्रकरणात जप्त केलेले वाहन परत करण्यासाठी एकाकडे ४० हजारांची लाच मागणाऱ्या मंचर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष सुरेश साळुंके (वय ४५), पोलीस शिपाई संदीप भिमा रावते (वय ३६) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनयमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणाविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात अपघात प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी तरुणाचे वाहन जप्त केले होते. वाहन परत करण्यासाठी साळुंके आणि रावते यांनी तरुणाकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तडतोडीत आठ हजार रुपयांचे मान्य केले.

हेही वाचा… जेवण केले नाही म्हणून पत्नीला बेदम मारहाण करून खून

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सापळा लावण्यात आला. तरुणाकडून लाच घेणाऱ्या पोलीस शिपाई रावते याला पकडण्यात आले. चौकशीत साळुंकेने रावते याच्यामार्फत लाच स्वीकारल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक शीतल जानवे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव, पोलीस निरीक्षक विद्युलत्ता चव्हाण यांनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A constable along with an assistant police inspector was arrested for demanding a bribe to return the vehicle seized in an accident pune print news rbk 25 dvr