नियोजित गृहप्रकल्पात चौथ्या मजल्यावर काम करणारा बांधकाम मजूर लाकडी पहाड (सांगाडा) तुटून पडल्याने मृत्युमुखी पडल्याची घटना कात्रज भागात घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी ठेकेदारासह बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>पुणे : ऑम्लेट व्यवस्थित बनविले नाही… ; पोलीस हवालदाराकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

धाकिया किसन देगावत (वय ३५, सध्या रा. नवाजीश पार्क, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. मजुराच्या सुरक्षेची काळजी न घेता दुर्घटनेस जबाबदार असल्या प्रकरणी ठेकेदार तसेच बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत धाकिया देगावत याचा भाऊ राजू (वय ३०, रा. मांगडेवाडी) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>>पुणे: गुजरात बर्फीचा पाच लाख ९० हजारांचा साठा जप्त; अन्न आणि ओैषध प्रशासनाची कारवाई

कात्रज येथील संतोषनगर भागात गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. गृहप्रकल्पात चौथ्या मजल्यावर धाकिया देगावत लाकडी पहाडावर उभे राहून प्लास्टरकाम करत होता. त्या वेळी अचानक लाकडी पहाड तुटला. धाकिया चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला. गंभीर जखमी झालेल्या धाकिया याचा उपचारांपूर्वी मृत्यू झाला. पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात बांधकाम मजुराच्या सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्याने दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात तपास करत आहेत.