पुणे : त्वरित ऑनलाइन कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने एका दाम्पत्याला साडेनऊ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनोजकुमार नावाच्या सायबर चोरट्याच्या विरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाम्पत्याला व्यवसायासाठी कर्जाची गरज होती. चोरट्याने तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठविली होती. त्वरित कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते. मनोजकुमार याच्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. तेव्हा कर्जमंजुरी प्रक्रियेसाठी काही रक्कम भरावी लागेल, अशी बतावणी मनोजकुमारने त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरट्याने त्यांना ऑनलाइन पद्धतीने काही रक्कम पाठविण्यास सांगितले.

हेही वाचा – पुणे मेट्रोच्या कामात अनेक त्रुटी, शहरातील ज्येष्ठ अभियंत्यांची उच्च न्यायालयात धाव

हेही वाचा – दहा हजार एकरवरील द्राक्षबागांना अवकाळीचा फटका; दर कोसळले, निर्यातीवर परिणाम; सोलापूर विभागात सर्वाधिक नुकसान

कर्जमंजुरीच्या आमिषाने दाम्पत्याकडून वेळोवेळी नऊ लाख ३७ रुपये चोरट्याने उकळले. त्यानंतर चोरट्याने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दाम्पत्याने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A couple was looted by cyber thieves on the lure of loan approval pune print news rbk 25 ssb
Show comments