जेजुरी : राज्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान सुरू असताना निरा (ता. पुरंदर) येथील श्रीराम हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉ. सचिन रणनवरे याच्यासह तिघांवर जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गर्भपाताचे हे प्रकरण उघड झाल्याने आणखी एक कळी जन्माआधीच खुडली गेली.

या बाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येल्लमपल्ली यांनी या बाबत जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ‘मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही निरा येथील श्रीराम हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. पण, आम्ही पोचण्यापूर्वी रात्रीच गर्भपात करून रुग्णाला घरी सोडण्यात आले होते. संबंधित रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्याची कोणतीही नोंद डॉक्टरांनी ठेवली नव्हती. त्यामुळे रुग्ण येथे आलाच नव्हता, अशा पद्धतीने सर्व व्यवस्था केली होती’, असे डाॅ. येल्लमपल्ली यांनी सांगितले.

RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल

हेही वाचा >>> भाजपचे आता पुण्यात ‘घर चलो’ संपर्क अभियान, देवेंद्र फडणवीस उद्या पुणे दौऱ्यावर

श्रीराम हॉस्पिटलमधील सोनोग्राफी केंद्रावर गर्भपात करणाऱ्या रुग्णाचे नाव दिसले नाही. त्यानंतर गर्भपात करणाऱ्या रुग्णाबद्दल विचारले असता डॉ. रणनवरे यांनी कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. गर्भपात करणाऱ्या रुग्णाचा क्रमांक मिळाल्याने थेट त्याच्याशी मोबाईल फोनवर संपर्क साधण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात गर्भलिंग निदान करणे आणि गर्भपात करण्यापर्यंतची व्यवस्था बरकडे नावाच्या एजंटमार्फत करण्यात येत असल्याचीही खळबळजनक माहिती पुढे आली.

हेही वाचा >>> पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार,सर्वेक्षणानंतर ‘या’ सुधारणा प्रस्तावित

या भागात बेकायदा गर्भपात करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे यावरून स्पष्ट होते, अशी माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. गर्भलिंगनिदान करणाऱ्या महिलेला पहिली मुलगी होती. त्यामुळे दुसऱ्या वेळी गर्भधारणा झाल्यानंतर गर्भलिंग निदान करण्यात आले. दुसरी मुलगी नको, हे गर्भपातामागचे मुख्य कारण असल्याचे उघड झाले आहे. गर्भपात झालेल्या महिलेला पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करून तिची सविस्तर तपासणी करणे आवश्यक आहे, असेही आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader