१४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी विठ्ठल सखाराम पोळेकर यांनी नेहमीप्रमाणे त्यांचं पुण्यातल्या पोळेकरवाडीतलं घर जाण्यासाठी मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी सोडलं. विठ्ठल पोळेकर हे सरकारी बांधकाम व्यावसायिक होते. सिंहगडाच्या दिशेने ते वॉकला जात होते. त्यांचा हा नित्यनेम होता. मात्र ती सकाळ त्यांच्या आयुष्यातली त्यांच्या आयुष्यातली शेवटची सकाळ ठरली.

विठ्ठल पोळेकर यांची हत्या नेमकी कशी झाली?

१४ नोव्हेंबर २०२४ रोजी भामे आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांनी पोळेकर यांचे मोटारीतून अपहरण केलं. त्यानंतर त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केला. खून केल्यानंतर अवयव खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टाकून दिले होते. या प्रकरणात भामे याचे साथीदार शुभम पोपट सोनवणे (वय २४, रा. चिंचली गुरव, जि . अहिल्यानगर) आणि मिलिंद देवीदास थोरात ( वय २४, र. बेळगाव , अहिल्यानगर) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.

पहाटे साडेपाचच्या सुमारास अपहरण करुन हत्या

मॉर्निंग वॉकसाठी सिंहगड किल्याच्या पायथ्याशी गेल्यानंतर १४ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास त्यांचे कारमधून अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर अवघ्या ४० मिनिटांत त्यांचा सपासप वार करून खून केला होता. नंतर त्यांचा मृतदेह टाकून दिला होता. याप्रकरणाचा तपास करत असताना खून योगेश भामेने साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे समोर आले होते. तपासात आरोपी परराज्यात असल्याची माहिती मिळाली होती. परंतु, पोलिसांना त्याठिकाणी मिलींद व शुभम दोघेच हाती लागले होते. तर, योगेश हा पसार झाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून त्याचा शोध घेतला जात होता. खंडणीसाठी सरकारी बांधकाम व्यावसायिकाची हत्या झाल्याच्या या प्रकरणाने पुणे हादरून गेलं. मात्र पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपींना गजाआड केलं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

विठ्ठल पोळेकर यांच्या मुलीने काय सांगितलं?

या घटनेनंतर विठ्ठल पोळेकर यांच्या मुलीने म्हणजेच सोनालीने पोलिसांना सांगितलं की माझे बाबा मॉर्निंग वॉकला गेले होते ते परतले नाहीत म्हणून आम्ही त्यांचा शोध सुरु केला. आजूबाजूच्या गावांमध्ये आहेत का? सिंहगडावर गेले आहेत का? त्यांच्या मित्रांच्या घरी आहेत किंवा कुठल्या नातेवाईकांकडे गेले आहेत का? हे सगळं आम्ही तपासलं पण बाबांचा शोध लागला नाही. त्यामुळे बाबा (विठ्ठल पोळेकर) बेपत्ता झाल्याची तक्रार आम्ही केली. यानंतर आणखी काही गोष्टींचा खुलासा झाला आणि पोळेकर कुटुंब दहशतीच्या सावटाखाली होतं हे पोलिसांना समजलं. विठ्ठल पोळेकर राहात होते त्याच भागात बीबी बॉईज नावाची एक गँग होती. गँगस्टर योगेश उर्फ बाबू भामे हा विठ्ठल पोळेकर आणि त्यांच्या कुटुंबाला धमक्या देत होते, खंडणी मागत होते ही बाब समोर आली.

१६ नोव्हेंबर २०२४ ला काय घडलं?

१६ नोव्हेंबर २०२४ या दिवशी कुटुंबाला जी भीती वाटत होती ती खरी ठरली. पोलिसांना तपास करताना एका मृतदेहाचे काही तुकडे पानशेत धरणाजवळ मिळाले. फॉरेन्सिक टीमने जो अहवाल दिला त्यानंतर हे स्पष्ट झालं की हे विठ्ठल पोळेकर यांच्याच मृतदेहाचे तुकडे आहेत. विठ्ठल पोळेकर यांची हत्या करुन त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. यानंतर संशयाची पहिली सुई ही थेट भामे गँगपाशीच गेली. पोळेकर कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार या गँगने एकदा विठ्ठल पोळेकर यांचा मुलगा प्रशांत याचा कारचा ३० किलोमीटरपर्यंत पाठलाग गेला होता. तसंच ही गँग अनेकदा विठ्ठल पोळेकर यांच्या कारचा पाठलाग करायची ही बाबही समोर आली.

खंडणी द्या किंवा जॅग्वार, बीबी गँगची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विठ्ठल पोळेकर यांना २०२२ मध्ये पायगुडेवाडी आणि गोळेवाडी या दोन गावांमध्ये रस्ता बांधण्याचं कंत्राट मिळालं होतं. त्यानंतर भामेने आणि बीबी गँगने पोळेकर यांच्याकडे दोन कोटींची खंडणी द्या किंवा जॅग्वार कार द्या अशी मागणी पोळेकर यांच्याकडे केली होती. तसंच यापैकी काहीही न दिल्यास तुम्हाला आणि तुमच्या मुलाला ठार मारु अशीही धमकी दिली होती. २०२४ च्या सप्टेंबर महिन्यात बीबी बॉईज या गँगने पोळेकर आणि त्यांच्या कुटुंबावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली, अनेकदा गँगचे लोक हे पोळेकर यांच्या घरासमोर तास न् तास उभे असत. तसंच ज्या बाबू भामेने पोळेकरांना ठार मारण्याची धमकी दिली होती त्याच्याकडे पिस्तुल होतं हेदेखील त्यानेच पोळेकरांना सांगितलं होतं.

डोणजे गावात बीबी गँगची दहशत

भामे आणि त्याच्या गँगने डोणजे गावातत तसंच सिंहगड रोड भागात प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्यामुळे आम्ही घाबरुन भामे आणि त्याच्या गँगच्या विरोधात तक्रार केली नाही असं पोळेकर कुटुंबाने पोलिसांना नंतर सांगितलं. विठ्ठल पोळेकर यांचं आधी अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण करण्याच्या तीन दिवस आधी भामे आणि त्याच्या गँगने प्रशांत पोळेकर यांच्या ऑफिसमध्ये घुसून पुन्हा एकदा दोन कोटींची खंडणी मागितली आणि ती द्यायची नसेल तर जॅग्वार कार द्या असं सांगितलं. मात्र प्रशांतने सपशेल नकार दिला. ज्यानंतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला आम्ही ठार करु अशी धमकीही प्रशांत पोळेकर यांना धामे आणि त्याच्या गँगने दिली.

बाबू धामेला जानेवारी २०२५ मध्ये अटक

विठ्ठल पोळेकर यांच्या हत्येनंतर पुढील काही दिवसांतच पोलिसांनी शुभम पोपट सोनावणे, बाळू भामे आणि देवीदास थोरात या तीन संशयितांना अटक केली. या प्रकरणात बाबू धामे हा मुख्य संशयित होता जो फरार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेऊ लागले. जानेवारी पर्यंत बाबू भामे हा या प्रकरणात पोलिसांना तुरी देऊन पळण्यात यशस्वी होत होता. पण जानेवारी २०२४ मध्ये बाबू भामे पुण्याहून कोल्हापूरला चालला होता त्यावेळी त्याला पोलिसांनी अटक केली. भामेच्या विरोधात पोलिसांनी मकोका लावला आहे. दरम्यान पोलीस तपासात ही धक्कादायक बाब समोर आली की खंडणीखोरांनी पोळेकर यांचं अपहरण केल्यानंतर पुढच्या ४० मिनिटांतच त्यांची हत्या केली आणि त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन विल्हेवाट लावली.मुख्य सूत्रधार भामे पसार झाला होता. हत्येनंतर दोन महिने बाबू भामेबाबत माहिती मिळाली. ज्यानंतर पोलिसांनी त्याला जानेवारी महिन्यात अटक केली.