नगर रस्त्यावर वाघोली परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून ६५ हजार रुपयांचा तीन किलो गांजा, मोटार असा सात लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जुबेर रौफ शेख (वय ३७, रा. वानवडी बाजार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-नगर रस्त्यावर वाघोली परिसरात शेख गांजा विक्रीसाठी आला होता.
हेही वाचा >>>पुणे: गोदामात चोरीच्या उद्देशाने रखवालदाराचा खून; हडपसर भागातील खून प्रकरणाचा उलगडा, चोरटे अटकेत
गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून तीन किलो गांजा आणि मोटार जप्त करण्यात आली. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, विशाल शिंदे, मारुती पारधी, सचिन माळवे, रेहाना शेख, योगेश मोहिते आदींनी ही कारवाई केली.