पुणे : विश्रांतवाडी भागात वाहतूक शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्याने मद्याच्या नशेत दहशत माजविल्याची घटना उघडकीस आली. भर रस्त्यात तलवार उगारुन दहशत माजविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याच्या विरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय उर्फ करण लक्ष्मण जाधव असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. जाधव मुंढवा वाहतूक शाखेत नियुक्तीस आहे. धानोरीतील जाणता राजा चौकात जाधव तलवार घेऊन दहशत माजवित असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पथकाला मिळाली. पोलिसांनी त्याला पकडले. चौकशीत जाधव वाहतूक शाखेत पोलीस कर्मचारी असल्याचे उघडकीस आले. जाधव याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्या विरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जाधव याची चौकशी करण्यात आली. जाधव याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याने त्याला निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायु्क्त विजयकुमार मगर यांनी दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A drunken traffic police officer sword and terrorized pune print news rbk 25 ysh
Show comments