पुणे : जेवणात भाकरी न मिळाल्याने मद्यधुंद अवस्थेतील एका महिलेने उपहारगृहात गोंधळ घातला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला त्या महिलेने मारहाण केल्याची घटना मार्केट यार्ड भागात घडली. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच उपहारगृहात गोंधळ घातल्याप्रकरणी महिलेस अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी नूतन सुभाष सुर्वे (वय ४५, रा. केदारीनगर, वानवडी) हिला अटक करण्यात आली. या बाबत पोलीस नाईक वनिता माने यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वनिता माने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डच्या वाहनतळाजवळ श्रीसागर हाॅटेल आहे. हाॅटेलच्या मागील बाजूस मार्केट यार्ड पोलीस ठाणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूतन सुर्वे श्रीसागर हाॅटेलमध्ये जेवण करण्यासाठी आली होती. तिने मद्यपान केले होते. जेवणात भाकरी न दिल्याने सुर्वे संतापली. तिने उपाहारगृहातील कामगार आणि व्यवस्थापकास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या वेळी उपहारगृहात जेवण करणाऱ्या ग्राहकांच्या ताटात पाणी ओतले, तसेच ग्राहकांना तिने शिवीगाळ केली.

हेही वाचा – “आम्ही दगड मारून सभा, आंदोलनं….”, गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना…”

व्यवस्थापकाने त्वरित या घटनेची माहिती मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दिली. पोलीस कर्मचारी वनिता माने उपहारगृहात पोहोचल्या. त्या वेळी मद्यधुंद अवस्थेतील सुर्वेने गणवेशात असलेल्या माने यांच्या नावाची पट्टी खेचली. माने यांना धक्काबुक्की करtन त्यांचा अंगठा पिरगळला. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी सुर्वेला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A drunken woman create mess in a restaurant for not getting bhakri pune print news rbk 25 ssb
Show comments