पुणे : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी भागात घडली. अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून, पसार झालेल्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काशीनाथ अंबादास गवंडी (वय २४) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार शिवानंद राजशेखर गणमुखी (वय २४, सध्या रा. व्हीआयटी महाविद्यालय चौक, बिबबेवाडी, अप्पर इंदिरानगर) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत शिवानंद याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – शहरबात : नाकाबंदीचे फलित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीनाथ आणि शिवानंद बिबवेवाडी भागात राहायला आहेत. मंगळवारी दुपारी दुचाकीस्वार शिवानंद आणि त्याचा मित्र काशीनाथ मूळगावी निघाले होते. बोपोडीतील डॉ. आंबेडकर चौकात भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात काशीनाथ गंभीर जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता डंपरचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेला काशीनाथ आणि शिवानंद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच काशीनाथचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा – विधानसभा निवडणुकीमुळे पुण्यावर रक्तटंचाईचे सावट! रक्तपेढ्यांमध्ये पाच दिवसांचाच रक्ताचा साठा शिल्लक

पसार झालेल्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे तपास करत आहेत. शहर परिसरात दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांचे आदेश झुगारुन अवजड वाहनांची वाहतूक सर्रास सुरू आहेत. अवजड वाहनांच्या भरधाव वेगामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A fellow passenger on a two wheeler died after dumper hit accident at bopodi on mumbai pune road pune print news rbk 25 ssb