मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवलेनजिक असलेल्या वडगाव उड्डाणपुलाजवळ भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्योत्स्ना सूर्यकांत वाघुले (वय ४०, रा. दिघी) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार सूर्यकांत वाघुले (वय ४६) जखमी झाले आहेत. या प्रकरणी पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूर्यकांत यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – पुण्यात अप्पा बळवंत चौकामध्ये कोयता गँगकडून महाविद्यालयीन युवकावर वार, दोन अल्पवयीन मुले ताब्यात

हेही वाचा – “उपवास करून चांगली मुलगी मिळणार नाही”, गोपीचंद पडळकरांच्या विधानवरून विद्यार्थ्यांमध्ये पिकला हशा

दुचाकीस्वार सूर्यकांत आणि त्यांची पत्नी ज्योत्स्ना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून निघाले होते. वडगाव उड्डाणपुलाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्योत्स्ना यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.