सोसायटीच्या आवारात फटाके फोडण्यावरुन झालेल्या वादातून ज्येष्ठ महिलेसह दोघांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.गोट्या पवार, राहुल पवार, सौरभ सकट (तिघे रा. नाईकनवरे सोसायटी, ससाणेनगर, हडपसर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत मयूर सतीश गायकवाड (वय २२, रा. नाईकनवरे सोसायटी, ससाणेनगर, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>>पाऊस माघारी फिरताच थंडीची चाहूल ; राज्यभर रात्रीच्या तापमानात झपाटय़ाने घट, दिवसा उन्हाचा चटका
मयूर आणि आरोपी गोट्या, राहुल, सौरभ एकाच सोसायटीत राहायला आहे. फटाके फोडण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. या कारणावरुन मयूर, त्याचे काका किरण आणि आजी उषा यांना आरोपींनी मारहाण करुन शिवीगाळ केली. सहायक फौजदार शिंदे तपास करत आहेत.