पुणे: हडपसर भागातील मांजरीत एका भंगारमालाच्या गोदामास शुक्रवारी दुपारी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मांजरीतील गोडबोले वस्ती परिसरात भंगार मालाचे गोदाम आहे. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास गोदामातील मालाने पेट घेतला. गोदामातील मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक ठेवण्यात आले होते. प्लास्टिकने पेट घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा… पुणे: मोटारीचा धक्का लागल्याने तरुणाचा डोक्यात दगड घालून खून; चौघे अटकेत

जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. गोदामात कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली. आग लागल्याचे कारण समजू शकले नाही. भंगार मालाने पेट घेतल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांकडून प्रयत्न करण्यात येत आहे.