पुणे : कोकणातील कातळशिल्पांचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. कातळशिल्पांचे डिजिटल दस्तावेजीकरण, जैवविविधता, सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करून पथदर्शी आराखडा तयार करण्याचा राष्ट्रीय प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. पहिल्यांदाच कातळशिल्पांच्या अभ्यासासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रकल्प राबवला जाणार असून, राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या संस्थांचा या प्रकल्पात सहभाग आहे.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या या प्रकल्पात आयआयटी मद्रास, आयआयटी हैदराबाद, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि रत्नागिरी येथील निसर्गयात्री संस्था यांचा सहभाग आहे. दोन वर्षांच्या या प्रकल्पात कातळशिल्पे, जैवविविधता, सांस्कृतिक वारसा यांचा सर्वसमावेशक पद्धतीने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यास केला जाणार आहे. कातळशिल्पांच्या अभ्यासासह त्यांचे डिजिटल दस्तावेजीकरण, जैवविविधता आणि सांस्कृतिक वारशाचा अभ्यास, शाश्वत पर्यटन, तंत्रज्ञानाचा वापर, जनजागृतीसाठीचा पथदर्शी आराखडा तयार करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Volumes 1 to 20 of Marathi Encyclopaedia update using modern technology
मराठी विश्वकोशाचे खंड अद्ययावत होणार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; नवे शब्द, नोंदीची भर
Loksatta kutuhal How minerals got their names
कुतूहल: खनिजांना नावे कशी मिळाली?
Technology and Urbanization Human Progress
तंत्रकारण: तंत्रज्ञान आणि नागरीकरण
konkan itihas parishad national convention thane first february
कोकण इतिहास परिषदेचे १४ वे राष्ट्रीय अधिवेशन, डॉ. अरविंद जामखेडकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार
तर्कतीर्थ विचार: तर्कतीर्थांचे वेदाध्ययन
Amitav ghosh,
बुकबातमी : लेखकाच्या सर्व छटा…

हेही वाचा >>> ‘डीआरडीओ’ चे संचालक प्रदीप कुरुलकरांच्या एटीएस कोठडीत १६ मेपर्यंत वाढ

प्रकल्पाविषयी कातळशिल्पांचे अभ्यासक आणि समन्वयक ऋत्विज आपटे यांनी माहिती दिली. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पात आयआयटी मद्रासमधील प्रवर्तक ही संस्था डिजिटल दस्तावेजीकरणाचे काम करणार आहे. त्रिमितीय तंत्रज्ञान, शाश्वत पर्यटनवाढीसाठी आयआयटी हैदराबादकडून मार्गदर्शन करण्यात येईल. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून कातळशिल्पांच्या कालखंडाशी निगडित अभ्यासाचे काम केले जाणार आहे. तर निसर्गयात्री संस्था जनजागृती करण्यासह प्रकल्पात समन्वयाचे काम करेल. कातळशिल्पांच्या अभ्यासासाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर व्यापक पद्धतीने दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे गेली दहा वर्षे कातळशिल्पांबाबत सुरू असलेल्या कामाला पावती मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून कातळशिल्पांसाठी सुरू करण्यात आलेला प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कातळशिल्पांचा सर्वसमावेशक अभ्यास होणार आहे, असे राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सांगितले.

Story img Loader