पुणे: कोंढवा भागातील बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर कोंढवा भागात पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी दहा, अकरा, तसेच तेरा वर्षाच्या मुलाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलाच्या पालकांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि गु्न्हा दाखल करण्यात आलेली अल्पवयीन मुले एकाच सोसायटीत राहायला आहेत. पाच वर्षांचा मुलगा सोसायटीच्या आवारात खेळत होता. त्यावेळी मुलांनी सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या मुलाला मोबाइलवरील अश्लील चित्रफीत मुलाला दाखविले. मुलाशी अश्लील कृत्य केले.

हेही वाचा >>>महाराष्ट्रातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू; नंदुरबार जिल्ह्यातून परतीचा प्रवास सुरू

त्यानंतर पीडित मुलाशी अल्पवयीनांना पु्न्हा अश्लील कृत्य केले. मुलांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे पाच वर्षांच्या मुलांनी या प्रकाराची माहिती पालकांना दिली. पालकांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. कोंढवा पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

हेही वाचा >>>पुण्यात बजरंग दलाकडून दांडिया कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न; सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, “गुंडगिरी…”

अत्याचाराच्या वाढत्या घटना

वानवडी भागातील दोन शाळकरी मुलींशी व्हॅनचालकाने अश्लील कृत्य केल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर खराडी भागातील एका नामांकित शाळेतील तिसरीतील मुलीबरोबर शाळेच्या आवारात अश्लील कृत्य करण्यात आल्याची घटना घडली. शहर, परिसरात अल्पवयीन मुलांवर गेल्या नऊ महिन्यांत अत्याचाराच्या ३०० हून जास्त घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हे दाखल केले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A five year old boy was molested by minors pune print news rbk 25 amy