अमली पदार्थ बाळगणाऱ्या परदेशी नागरिकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून चार लाख ५७ हजारांचे अमली पदार्थ, मोबाइल संच असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हेही वाचा – बुलढाणा : पोलिसांची मोठी कारवाई ; ३५ लाखांचा गुटखा जप्त
नसबुग इस्माइल (वय २३, सध्या रा. ओैंध, मूळ रा. युगांडा ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खडकी बाजार परिसरात अमली पदार्थविरोधी पथक गस्त घालत होते. त्या वेळी एक परदेशी नागरिक अमली पदार्थ विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३२ ग्रॅम मेफेड्रोन, ४ मिलीग्रॅम मेथेक्युलाॅन असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याबाबत पोलीस कर्मचारी चेतन गायकवाड यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – बनावट सोने विकून लोकांना फसविले, पोलिसांना चकवा देण्यासाठी २५ सीम कार्ड बदली ; डोंबिवलीतील घटना
सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, एस. डी. नरके, संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, मयूर सूर्यवंशी, दिशा खेवलकर आदींनी ही कारवाई केली.