पिंपरी- चिंचवड शहरामध्ये अपघाताच सत्र थांबायचं नाव घेत नाही. निगडी येथे चारचाकीने दोन तरुणांना धडक दिल्याची घटना रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी वाहन चालक सुहास वसंत जोशी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतल आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संकेत सुनील सातपुते याने निगडी पोलिसात तक्रार दिली आहे. संकेतसह मेघज संजय पाटील हा देखील जखमी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील गुडलक चौकात रात्री सव्वा दहाच्या सुमारास संकेत आणि मेघज हे दोघे मेसवर जेवण करून त्यांच्या रूम कडे जात होते. तेव्हा गुडलक चौकातील रस्त्यावर त्यांना भरधाव चारचाकी गाडी क्रमांक एमएच- १२ आर.के ९२९१ या गाडीने त्यांना पाठीमागून धडक दिली. अपघातात संकेत आणि मेघज दोघे जखमी झाले आहेत. या दोघांना वाहन चालक याने तातडीने रुग्णालयात घेऊन गेले असल्याची माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन ताब्यात घेण्यात आल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिकचा तपास पोलीस करत आहेत.