पुणे : लोकसभा निवडणुकीला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी राहिला असून राज्यात अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाचे जगावाटप पूर्णपणे झाले नाही. तर प्रत्येक राजकीय पक्षाकडून चर्चाच सुरू आहे. या सर्व घडामोडी दरम्यान राज्यातील सर्व जनतेच लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची अद्यापपर्यंत घोषणा जरी झाली नसली तरी सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याच दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातील नामांकित वस्ताद आणि कुस्तीगीराचा स्नेह मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडला.
हेही वाचा – राणा दाम्पत्याची चहूबाजूंनी कोंडी, महायुतीतून आव्हान, भाजपमधूनही विरोध
यावेळी अजित पवार म्हणाले, आजच्या मेळाव्याला पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांतून पहिलवान आले आहेत. त्या सर्वांचे मी स्वागत करतो. तुमची शिरुर, पुणे, बारामती, मावळ यासह ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असणार आहेत त्या सर्वांना सहकार्य करा, तुम्ही आशीर्वाद द्या,आम्ही तुम्हाला निश्चित सहकार्य करू, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – कंगनाविरोधात हिमाचलमधील काँग्रेस नेत्यांबरोबरच ‘राजघराणी’ एकत्र?
मी काही स्वार्थासाठी बारामती, बारामती करायला आलो नाही, असे अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसेच ते पुढे म्हणाले की, तुम्हाला काही जणांचे फोन पण येतील आणि भावनिकदेखील करण्याचा प्रयत्न करतील, असे सांगत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.