पुणे : औंध भागातील एका गॅरेज चालकास सायबर चोरट्यांनी २५ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ३८ वर्षीय गॅरेज चालकाने शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार गॅरेजचालक औंध भागात वास्तव्यास आहे.
हेही वाचा – पुणे: प्रियकराची आत्महत्येची धमकी; घाबरलेल्या तरुणीची लाॅजमध्ये आत्महत्या
आरोपींनी गॅरेज चालकास समाजमाध्यमातून संदेश पाठविला होता. समाजमाध्यमातील जाहिरातीच्या ध्वनिचित्रफितींना दर्शक पसंती मिळवून (लाइक्स) दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी संदेशाद्वारे दाखविले होते. गॅरेज चालकास चोरट्यांनी ‘टास्क’ पूर्ण करण्यास सांगितले होते. सुरुवातीला गॅरेज चालकाला काही रक्कम देण्यात आली. सायबर चोरट्यांनी आणखी पैसे देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी गॅरेजचालकास काही रक्कम भरण्यास सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी गॅरेजचालकास आमिष दाखवून वेळोवेळी २५ लाख ५० हजार रुपये उकळले. गॅरेजचालकाने ऑनलाइन पद्धतीने चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठविले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गॅरेजचालकाने सायबर पाेलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक सावंत तपास करत आहेत.