पीएमपी बस प्रवासी ज्येष्ठ महिलेची ५० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली.याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची पत्नी नवी पेठेत नातेवाईकांकडे गेले होते.
हेही वाचा >>>पुणे : सोसायटीत फटाके फोडण्यावरुन वाद ; ज्येष्ठ महिलेसह तिघांना मारहाण
शास्त्री रस्त्यावरील पीएमपी थांब्यावरुन ते हडपसरकडे निघाले. प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नीच्या हातातील ५० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरली.हडपसरमधील पीएमपी थांब्यावर दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलीस कर्मचारी एस. आर. खामगळ तपास करत आहेत.