काँग्रेसला पुन्हा भरभराटीचे दिवस यावेत, यासाठी काँग्रेस भवनमध्ये चक्क होमहवन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी असा प्रकार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.शिवाजीनगर येथे १९४० मध्ये काँग्रेस भवनची स्थापना करण्यात आली. काँग्रेस भवनच्या इतिहासात पहिल्यांदाच होमहवन आणि पूजाअर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, काँग्रेस भवनमध्ये असा प्रकार झालेला नाही. चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाई फेकण्याच्या प्रकाराची चर्चा सुरू असताना, लक्ष विचलित करण्यासाठी ही राजकीय खेळी आहे.