लोणावळ्यातील हॉटेल व्यवसायिकाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील भाषा वापरत शिवीगाळ केल्या प्रकरणी पूर्व मुंबईच्या पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. लोणावळ्यातील हॉटेल एरॉन रिसॉर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिल वडगामा वय- ५६ रा. लोणावळा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. वर्षभर अल्पवयीन मुलीचा मानसिक छळ आणि विनयभंग केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. १७ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने पूर्व मुंबई पंतननगर पोलिसात तक्रार दिली आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी ही पूर्व मुंबई घाटकोपर या ठिकाणची आहे. पीडित मुलीची आई टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करते. यानिमित्त पीडित मुलीची आई ही लोणावळ्यात यायची. सोबत पीडित मुलगी ही असायची. अनिल वडगामा हे त्यांच्या व्यवसायात पैश्यांची मदत करत होते असे तक्रारीत म्हटले आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही आरोपी अनिलला ‘अंकल’ म्हणत. परंतु, अनिल वडगामा हा अल्पवयीन मुलीला वेगळ्या नजरेने पाहायचा. मुलीला मॅसेज करायचा, पीडित मुलीगीदेखील वडीलधारी व्यक्ती असल्याने त्याच्या मॅसेजला उत्तर द्यायची. मात्र, अनिल वडगामा हा अश्लील मॅसेज करत होता. पीडित अल्पवयीन मुलीने अनिलला असे मॅसेज करू नका असे बजावून सांगितलं. यावर आई आणि वडिलांच्या व्यवसायात पैशांची मदत करणार नाही, असं म्हणत अप्रत्यक्षपणे पीडितेला धमकावले. नाइलाजाने ती अनिलच्या मॅसेजला उत्तर द्यायची.

Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Sangli Crime News
Sangli Crime : सांगलीत १०० रुपयांचं स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या, तिघांना अटक
shreya talpade and aloknath fir
अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर गुन्हा दाखल, फसवणुकीच्या प्रकरणात आले नाव; काय आहे प्रकरण?
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
Pune Crime News
Pune Crime : “कात्री खुपसून पत्नीची हत्या करत पतीने व्हिडीओ शूट केला, आणि…”; पोलिसांनी सांगितला खराडीतील घटनेचा तपशील
person who came to Thane for selling whale fish vomit ambergris arrested by thane Polices Crime Investigation Branch
वारजे भागात सराईताकडून तरुणावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत अटकेत

हेही वाचा – वारजे भुयारी मार्ग परिसरातील साताऱ्याकडे जाणारी एक मार्गिका २ फेब्रुवारीपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

हेही वाचा – ललित पाटीलचा ससूनमधील मुक्काम कसा वाढला? तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव ठाकूर यांच्या जबाबातून माहिती उघड

एकेदिवशी मुंबईत व्यवसायानिमित्त भेटीदरम्यान अनिलने पीडितेची आई वॉशरूमला जाताच तिचे चुंबन घेतले. यामुळे ती अधिकच मानसिक तणावात आणि घाबरलेल्या अवस्थेत होती. आई – वडिलांच्या व्यवसायात व्यत्यय नको म्हणून ती मानसिक त्रास सहन करत होती. अनिल हा पीडित १७ वर्षीय मुलीला मनासारखे न वागल्यास अश्लील भाषा वापरत शिवीगाळ करायचा. अखेर या सर्व घटनेला कंटाळून तिने याबाबतची माहिती आई आणि वडिलांना दिली. या प्रकरणी पूर्व मुंबई पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून एरॉन रिसॉर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर आरोपी अनिल वडगामाला अटक करण्यात आली आहे. ही घटना डिसेंबर २०२२ ते १५ डिसेंबर २०२३ दरम्यान घडली.

Story img Loader