पुणे : शुक्रवार पेठेतील चिंचेची तालीम परिसरातील एका सदनिकेत दाम्पत्य मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.

हेमंत रामकृष्ण थोरात (वय ६४) आणि त्यांची पत्नी सुनीता (वय ५८, दोघे रा. सेवा मित्र मंडळाजवळ, चिंचेची तालीम, शुक्रवार पेठ) अशी मृतावस्थेत सापडलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. थोरात दाम्पत्याचा घराचा दरवाजा सकाळी बंद होता. दरवाजा उघडा नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. शेजाऱ्यांनी दरवाजा वाजविला. मात्र, थोरात यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर या घटनेची माहिती खडक पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा सुनीता काॅटवर बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळून आले. हेमंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?

हेही वाचा – पुणे : आईच्या प्रियकराने केले अल्पवयीन मुलींवर अत्याचार

सुनीता आणि हेमंत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सुनीता गेल्या तीन ते चार वर्षांपासून आजारी होत्या. सुनीता यांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. खडक पोलिसांकडून थोरात यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालात सुनीता यांच्या मृत्यूमागचे कारण समजेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.